अंडर 15 बी सी सी आय वुमेन्स टॉफीमध्ये महाराष्ट्राचा संघ फायनल मध्ये

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/01/2026 7:25 PM

*सांगली चे प्रशिक्षक व खेळाडू यांची चमकदार कामगिरी*

सांगली:बीसीसीआय अंतर्गत सुरू असलेल्या Under 15 बी सी सी आय वुमेन्स ट्रॉफी मध्ये महाराष्ट्राचा संघाने फायनल मध्ये प्रवेश केला असून सदर स्पर्धे मध्ये सांगली च्या प्रशिक्षक व खेळाडू यांनी चमकदार कामगिरी केली आहे 
    सांगलीचे प्रशिक्षक विजय वावरे व गणेश कुकडे हे बॉलिंग व फिल्डिंग प्रशिक्षक म्हणून या संघा सोबत काम करत आहेत तर कृष्णा सगरे व श्रेया जगदाळे या मुली या संघांचे प्रतिनिधित्व करत आहेत.
सांगली जिल्हा व विशेष करून ग्रामीण भागातून या सगळ्यांच मनःपूर्वक कौतुक होत आहे.

या प्रशिक्षक व खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार माननीय संजय बजाज साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

तसेच सांगली जिल्हा क्रिकेट खजिनदार  सिके पवार , सदस्य किशोर शाह,  टूर्नामेंट कमिटीचे सदस्य निलेश शहा   व  अमित फारणे युसूफ जमादार यांनी प्रशिक्षक व खेळाडूंचे मनापासून विशेष अभिनंदन केले.

Share

Other News

ताज्या बातम्या