माजी सैनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य;31 मार्चनंतर सर्व सेवा ऑनलाईन – निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 19/01/2026 7:55 PM

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांच्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ३१ मार्च २०२६ नंतर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत दिली जाणारी आर्थिक मदत व इतर सर्व सेवा केवळ ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.

यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी https://mahasainik.maharashtra.gov.in किंवा DSW पोर्टल या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरावा व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक असून, ती सर्व पीडीएफ स्वरूपात अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, डिस्चार्ज बुकची सर्व पाने, पीपीओ (पेन्शन पेमेंट ऑर्डर), ईसीएचएस कार्ड, पेन्शन जमा होणाऱ्या बँकेच्या पासबुकचे पहिले पान तसेच पासपोर्ट साईज फोटो यांचा समावेश आहे.

नोंदणी पूर्ण न झाल्यास भविष्यात आर्थिक मदत व इतर योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व पात्र माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असेही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या