NSS विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन उत्साहात संपन्न

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 19/01/2026 7:46 PM

NSS विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन उत्साहात संपन्न
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सलग्न शिक्षण मंडळ भगूर संचालित श्री एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, देवळाली कॅम्प येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन शनिवार, दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी मु. पो. साकुर, ता. इगतपुरी, जिल्हा नाशिक येथे उत्साहात संपन्न झाले.
या शिबिराची थीम “शाश्वत विकासासाठी युवक – पाणलोट व पडीत जमीन व्यवस्थापन” अशी असून युवकांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धन व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
शिबिराचे उद्घाटन मा. श्री सागरजी वैद्य सर (सिनेट व मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री सचिन शिवराम पाटील , कार्यवाह, शिक्षण मंडळ भगूर हे उपस्थित होते. याप्रसंगी मा. श्री गणेश चव्हाण सर, कायमसेवक प्रतिनिधी, शिक्षण मंडळ भगूर, साकुर गावचे पोलीस पाटील मा. श्री शिवाजी सहाणे, तसेच श्री तुकाराम सहाणे, श्री सोमनाथ सहाणे, श्री भाऊसाहेब कडभाने आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटक मा. श्री सागरजी वैद्य सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचा अर्थ, उद्देश व महत्त्व विद्यार्थ्यांना स्पष्टपणे समजावून सांगितले. NSS च्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम, त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर होणारा परिणाम व या उपक्रमांचा पुढील शैक्षणिक व व्यावसायिक जीवनात होणारा उपयोग याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री सचिन शिवराम पाटील सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सुप्रिया हंडोरे यांनी केले, प्राचार्य डॉ मृत्युंजय कापसे यांनी प्रास्ताविकात श्रम संस्कार शिबिराचे महत्व नमूद केले..तर आभार प्रदर्शन प्रा. अश्विनी ठाकरे यांनी केले.
या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या