दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी भालचंद्र पाटील यांची निवड, समाजाच्या विविध स्तरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/05/2025 10:06 AM


सांगली : प्रसिद्ध उद्योजक आणि विविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणारे दक्षिण भारत जैन सभेचे विद्यमान अध्यक्ष मा. भालचंद्र विरेंद्र पाटील यांची दक्षिण भारत जैन सभेच्या सन 2025 ते 2028 या कालावधीकरीता बहुमताने निवड करण्यात आली. यामध्ये उपस्थित 72 पैकी 68 सदस्यांनी एकमुखी हात उंचावून या निर्णयाला मान्यता दिली. उर्वरित चार सदस्यांनी त्यांच्या निवडीचे अभिनंदनही केले. आज दक्षिण भारत जैन सभेच्या सांगली येथील शेठ रा.ध.दावडा दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये झालेल्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांची ही निवड झाली.
सभेच्या घटनेनुसार दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षांची निवड हे येणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनापूर्वी दोन महिने आधी होणाऱ्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या बैठकीत होत असते. त्याप्रमाणे आज मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये कर्नाटक विभागाचे आश्रयदाता ट्रस्टी श्री. अभिनंदन रावसाहेब पाटील यांनी श्री. भालचंद्र पाटील यांची अध्यक्षपदासाठी एकमताने निवड करीत असल्याची सूचना मांडली. त्याला सभेचे खजिनदार श्री. संजय शेटे यांनी अनुमोदन दिले. यावेळी मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने हात उंचावून या निर्णयाला संमती दिली.
श्री. भालचंद्र पाटील यांनी गेली 15 वर्षे सभेच्या कार्यात चांगले योगदान दिले असून अध्यक्षपदी निवड झाल्यापासून गेल्या सहा महिन्यात त्यांनी कामाचा झंझावत तयार केलेला आहे आणि याचे स्वागत जैन समाजाने केलेले आहे. त्यांनी सभेचे दहा हजाराहून अधिक सभासद वाढविले. पुण्यासारख्या शहरात बोर्डिंग सुरू केले. समाजातील दारिद्ररेषेखालील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथमाचार्य शांतिसागर शैक्षणिक दत्तक शिष्यवृत्ती योजना राबवून यावर्षी सुमारे 20 लाखाचे वितरण करून सभा ही समाजातील वंचितांच्या शिक्षणासाठी भरीव योगदान देते हे दाखवून दिले. 20 लाखाहून अधिक परतीची शिष्यवृती रक्कमही वसुल झाली आहे. मागील त्याला सभासदत्व देवून सभा समाजाभिमुख केली. सभेच्या विस्तारासाठी प्रगतीचे रूप पालटवून, त्याचे वर्गणीदार वाढविले. मुंबईमध्ये सभेचे कार्यालय आणि वसतीगृह निर्माण करण्याचे त्यांनी संकल्प सोडला आहे. सभेच्या कामकाजामध्ये गतिमानता निर्माण करताना त्यांनी सभेच्या युवा कार्यकर्त्यांची एक भक्कम फळी निर्माण केली आहे. त्यामुळे जैन समाज आपल्या समोरील आव्हाने समर्थपणे पेलेल हा विश्वास सभेकडून समाजाला प्राप्त होण्यासाठी भालचंद्र पाटील यांची दूरदृष्टी, नेतृत्वाची धमक समाजाच्या हिताचे ठरेल. त्यांच्यावर समाजाच्या विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या