कुपवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मनपा कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/05/2025 8:24 PM

कुपवाड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कुपवाड व परिसरातील ड्रेनजमुळे खराब झालेले रस्ते त्वरित दुरुस्त करण्याकरिता मनपा कार्यालय समोर घंटानाद आंदोलन केले.

कुपवाड मधील पाण्याची टाकी ते जकात नाका पर्यंत रस्ता, आलिशान कॉलनी, हजरत लाडले मशायक कॉलनी, जयहिंद कॉलनी, रुमाले मळा येथे वाहतुकीसाठी सर्व रस्ते कच्चे आणि खराब आहेत, दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांचे येथील रस्त्यावरून वाहतूक करताना चिखलामुळे फार हाल होतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष दाऊद मुजावर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोतरे, मुदस्सर मुजावर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाडच्या वतीने आज घंटानाद आंदोलन मनपा कुपवाड कार्यालय समोर पुकारले होते, या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरजिल्हा अध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे सर, युवक शहरजिल्हा अध्यक्ष आकाश माने, अल्पसंख्याक शहरजिल्हा अध्यक्ष मुनीर मुल्ला यांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दिला. कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोतरे, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तोहीद शेख, कुपवाड शहर कार्याध्यक्ष अरुण रुपनर, युवक कुपवाड अध्यक्ष दादासो कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव, अरबाज मुल्ला, वसीम बागवान, निहाल मुजावर, निहाल इनामदार, नजीर सय्यद इत्यादी पार्टी पदाधिकारी व भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
       याआंदोलनाची दखल घेण्याकरिता आंदोलनस्थळी सांगली महानगरपालिका बांधकाम विभागाचे आप्पा हलकुंटे, ड्रेनज विभाग चिदानंद कुरणे, कुपवाड कार्यालय सहाय्यक आयुक्त सचिन सावगावकर, कुपवाड बांधकाम विभाग अशोक कुंभार, विठ्ठल इंगळे महानगरपालिकेचे अधिकारी आंदोलन स्थळी उपस्थित राहून निवेदन घेतले असता. आम्ही त्यांना प्रत्यक्ष भागाची पाहणी करण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी संपूर्ण भागाची पाहणी केली. आणि येत्या आठ दिवसांत प्रत्यक्ष कामास सुरवात करण्याची हमी दिली. त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित  केले. परंतु येत्या आठ दिवसांत कामास सुरुवात न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या