आढावा मिटींग जरूर घ्या, पण जागेवर पहाणी करणे गरजेचे : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/05/2025 10:41 AM

आपत्ती व्यवस्थापन व सध्याच्या महापालिका क्षेत्रातील पावसाळ्यातील परिस्थितीबाबत आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मध्ये खासदार विशाल दादा पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीर दादा गाडगीळ व मनपा प्रशासन यांची संयुक्त मिटींग आहे असे कळते.
काल सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी काकडे साहेब यांनी संभाव्य पूर परिस्थितीची पाहणी केली 
माझ्या आपणा सर्वांना विनंती आहे तुम्ही प्रयत्न करता काम करता प्रशासन अधिकारी हे नवीन आहेत ठीक आहे मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील स्थानिक अधिकारी कर्मचारी यांना 2005 पासून महापूर काय असतो आपल्या शहराची भौगोलिक परिस्थिती काय आहे सर्वांना माहित आहे.
महापालिकेची नालेसफाई दरवर्षी करावी लागते दरवर्षी पावसाळा कधी असतो हे सगळं माहित असताना अगदी घाई गडबडीने पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईचे टेंडर काढणे याचा अर्थ काय नेमकं प्रशासकीय अधिकारी काय काम करतात...?
आता सध्याच्या परिस्थितीमध्ये नालेसफाईसाठी मशिनरी चालत नाही..?
मग त्याचे बिल काढून मजाच करणार..?
आपण आपापल्या कार्यालयात आढावा मीटिंग घेता ठीक आहे तो एक कामाचा भाग आहे मात्र नदीकडे ला पाहणी करण्यापेक्षा नेमकी शहरात काय परिस्थिती आहे काय अवस्था आहे नागरिक कसे जगत आहेत ना आल्यावर किती ठिकाणी अतिक्रमण आहे तत्कालीन मनपा माजी नगरसेवक नालासोच्छे करताना नागरिकांच्या हाता पाया पडून त्यांच्या खाजगी प्लॉट मधून पाणी काढून घेतात त्यावर प्रशासन दीर्घकालीन उपाययोजना काय करते काही कळत नाही सगळ्यांना सगळं माहीत असतं मात्र गांधारीची भूमिका घेणारे स्थानिक प्रशासकीय अधिकारी हे नेमके काय काम करतात हा खरा प्रश्न आहे.
आपण आढावा मीटिंग जरूर करा मात्र जागेवर जाऊन परिस्थितीची पाहणी कधी करणार आहात 
शामराव नगर साठी जागतिक बँकेकडून पाणी काढण्यासाठी सहाशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्याच्यात टेंडर निघतील ते मॅनेज होतील त्याची टक्केवारी मिळेल की तुम्ही जरूर घ्या 
मात्र त्याचा उपयोग किती होणार आहे त्याचा अभ्यास करा  
लोक नरक याताना भोगत आहेत पुराच्या आधीच कोल्हापूर रोडला लोकांच्या घरात पाणी झिरपून येत आहे त्यावर उपाययोजना काय?
हॉटेल उदयच्या पाठीमाग पाणी साठलेल्या भागांमध्ये मासे मरून पडले आहेत त्याचा घाण वा सुटला आहे.
तो वास मनपा कर्मचाऱ्यांना येत नसेल का त्यांना दिसत नसेल का हा करा प्रश्न आहे 
असो यातून काहीतरी चांगला धडा घेऊन मार्ग निघेल व आपण मार्ग काढायला एवढीच भोळी भाबडी अपेक्षा.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या