चैत्रबन नाल्यचे पाणी नागरिकांच्या घरात, आयुक्तांनी लक्ष द्यावे : लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/05/2025 7:41 AM

* सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून एकीकडे मान्सून पूर्व नालेसफाई केली जात आहे परंतु दुसरीकडे मात्र वार्ड क्रमांक आठ मधील आनंद नगर गल्ली नंबर 3 मध्ये अर्धवट रस्त्याचे कामामुळे चैत्रबन नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे चैत्रबन नाला भरून वाहत असून यामध्ये दूषित पाणी रस्त्यावरून नागरिकांच्या घरात शिरले आहे. नागरिकांना याच दूषित पाण्यातून ये जा करावी लागत असल्याने,नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून महानगरपालिका प्रशासनाने ताबडतोब याकडे लक्ष देऊन लोकांना या घाण आणि दुर्गंधीयुक्त पाण्यापासून वाचवावे अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या वतीने आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे करत आहोत. आयुक्तांनी ताबडतोब याकडे लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना सुचित करावे हे नम्र विनंती!                    


*मनोज भिसे 
लोकहित मंच अध्यक्ष सांगली.*

Share

Other News

ताज्या बातम्या