काल कालच्या दैनिक तरुण भारत आणि आजच्या दैनिक पुढारी मध्ये बातम्या वाचल्या
म्हैशाळ येथील बंधारा 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे त्याची साठवण क्षमता एक टीएमसी असणार आहे त्याचे बॅक वॉटर सांगली कृष्णा नदी पात्रात कसबे डिग्रज पर्यंत वारणा नदीपात्रात समडोळीपर्यंत असणार आहे.
तसेच सांगलीच्या बंधाऱ्याजवळ मोठा बंधारा बांधून त्याची साठवण क्षमता अर्धा टीएमसी असणार आहे त्याचे कारण जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार आहे
मग वारणा उद्भव योजनेची गरज राहणार आहे का...?
याबाबत तज्ञांनी मार्गदर्शन करणे उचित आहे
आम्ही वारंवार हे समजून सांगत आलेलो आहे मात्र तात्कालीन आयुक्त सुनील पवार असतील तसेच गुप्ता साहेब असतील यांनी त्याच्याकडे केलेले दिसून आले आहे त्याचे कारण त्यांनाच माहीत
आमचे म्हणणे एवढेच आहे एकदा का सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका पाणीपुरवठा साठी राज्य सरकारकडून पैसे आले तर परत त्याच कामासाठी पैसे येणार नाही त्यामुळे सध्या आहे तीच कृष्णा नदीवरील यंत्रणा सक्षम करणे व दीर्घकालीन भविष्यातील उपाययोजना म्हणून थेट चांदोली धरणातून पिण्याचे पाणी आणणे...
आता तर कृष्णा नदी बंधाऱ्याजवळ नवीन बंधारा होणार आहे त्यामुळे पाणी टंचाईचा विषय राहणार नाही
आता राहिला प्रश्न कृष्णा नदी प्रदूषणाचा त्याबाबत सुद्धा सर्वांनी मिळून उपाययोजना करणे आवश्यक आहे.
वारणा उद्भव योजना म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात पडण्यासारखे आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.