1)आपण आयुक्त म्हणून या भागाची पाहणी करावी, पाहणी करत असताना सोबत सर्व शासकीय यंत्रणा सोबत असाव्यात, म्हणजे प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.
2)आपण या भागात असलेले खुले भूखंड याची माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात उपाययोजना करावी.
3) गुंठेवारी सदृश भाग असल्याने वयोवृद्ध आणि शाळकरी मुलांसाठी याचा भागात आरोग्य केंद्र व रुग्ण्वाहीका स्तिर असावी.
4)शामरावनगर परिसरासाठी असणारी स्वच्छता करणारे कर्मचारी नेहमी उपलब्ध असावेत.
5)कोल्हापूर रोड तातडीने पॅच वर्क करून रस्ता सुस्तीतीत आणावा.
6)गुंठेवारी भाग असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट आहे, म्हणून आपण पावसाळी मुरुमाची व्यवस्था करावी व रस्ते कार्यान्वित करावे.
आपण आम्ही केलेल्या मागणी संधर्भात सकारात्मक निर्णय घ्याल अशी अपेक्षा अन्यथा आम्हाला जनआंदोलन आंदोलन करावे लागेल.
या प्रसंगी महिला मोर्चा राज्य सरचिटणीस #स्वातीताई_शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अमर पडळकर, शहाजी भोसले, वैशाली पडळकर, जयश्री मगदूम, सुमित शिंदे, उदय भडेकर,लियाकत शेख, समीर मोमीन, आरिफ शेख, वरद पडळकर, संदीप लिंगले या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्तिथ होते.
यावर स्वःत आयुक्तांनी येथील नागरिकांसह पहाणी दौरा केला व सर्व प्रश्न त्वरीत सोडवण्याचे आश्वासन दिले.