*कुपवाडमधील एकमेव मध्यवर्ती ठिकाणी असलेली मुतारी*....
या मुतारीचा वापर येथील व्यापारी वर्ग,भाजीपाला विक्रेते व असंख्य लोक या मुतारीचा वापर करतात. अनेकवेळा निवेदने,संबंधीत अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून व फोनवरून सदर मुतारीच्या दुरावस्थेबद्दल तक्रारी करूनही दखल घेतली गेली नाही. या मुतारीजवळच लहान लहान मुलांची आंगणवाडी भरते त्या मुलांना नेण्या-आणण्यासाठी महिला येत असतात.मुतारीत उभं राहून मुत्रविसर्जन करता येत नसल्याने लोक लाज सोडून बाहेरच आपला विधी आवरतात.
आज याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सदर मुतारीस कुपवाडकरांनी पुष्पहार अर्पण केला.