खाजगी फायनान्स कंपनीची दादागिरी मोडीत काढत कर्जदाराला जप्त दुचाकी मिळवून दिली परत

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/05/2025 7:36 AM

#फायनान्स #अधिकारी - कर्मचाऱ्यांनी मिळून कर्जदाराचे १७,६३०/- सतरा हजार सहाशे तीस रुपये #लाटले...

सांगली येथील संदेश वडर यांची दुचाकी दि.६ मे रोजी मनबा फायनान्स चे कर्मचारी यांनी जबरदस्तीने दादागिरी करून बेकायदेशीरपणे शेवटच्या ३ हफ्त्या साठी ओढून नेली होती.
सदर वाहन नेल्या नंतर संदेश वडर व त्यांच्या नातेवाईक यांनी मनबा फायनान्स सांगली चे कार्यालय येथे जावून शेवटचे 3 हफ्ते भरण्याची तयारी दाखवून दुचाकी ताब्यात देण्याची मागणी केली असता मॅनेजर यांनी दुचाकी पाहिजे असल्यास 42000/- रु भरावे लागतील असे सांगून त्याशिवाय दुचाकी देणार नाही असे सांगितले.

कर्जदाराच्या कर्जाचे स्टेटमेंट बघितले असता असे लक्षात आले की कर्जदाराने नोव्हेंबर 2024 मध्ये एकूण 17630 रु रोख फायनान्स कंपनीच्या कर्मचारी यांचे कडे भरून पावती घेतली होती परंतु सदर कर्मचारी व अधिकारी यांनी  ती रक्कम कर्जदाराच्या कर्ज खात्यास जमा न करता संगनमताने अपहार केला होता त्यामुळे कर्जदाराचे 3 हफत्या ऐवजी 8 हफ्ते थकीत दाखवत होते.
झालेल्या या अपहराचा जाब विचारताच व ही बाब आमच्या लक्षात आली आहे हे समजताच दोन दिवसांनी म्हणजे सोमवार दि.26/5/2025 रोजी अपहार करण्याऱ्या कंपनीच्या अधिकारी/ कर्मचारी यांनी कर्जदाराच्या कर्ज खात्यास परस्पर रक्कम भरली.सदर रक्कम जमा केल्याचा मेसेज कंपनी चे मुख्य कार्यालय कडून कर्जदार यास आला व काही वेळाने कंपनीच्या मुख्य कार्यालय येथून फोन वरून आता कर्जाचे फक्त 3500रु राहिले असून उद्या सदर रक्कम भरून कर्ज खाते नील करून घ्यावे असे सांगण्यात आले.

त्या नुसार कर्जदार व आम्ही सदर 3500 रु भरण्यास कंपनीच्या सांगली येथील कार्यालयात  गेलो असता मॅनेजर उपस्थित नव्हते त्यावेळी तेथील कर्मचारी यास विचारणा केली असता त्यांनी ते बाहेर गेले असल्याचे सांगितले व त्यांना फोन करून कर्जदार 3500 रु भरण्यास आले असल्याचे व ते भरून घेवून वाहन ताब्यात मागत असल्याचे सांगितले.त्यावेळी त्यांनी सदर रक्कम भरून न घेता व कोणतही जबाबदारी न घेता, स्वतः कार्यालयात उपस्थित न राहता जाणीव पूर्वक आमचे वाहन हाडपण्याचे दृष्टीने आम्हास 4 वाजेपर्यंत ताटकळत ठेवले.

सदर वाहन हडपण्याच्या हालचाली चालू असल्याचे आमच्या निदर्शनास आल्यावर आम्ही सदर वाहन जेथे ठेवले होते तेथील गोडवून चालकास सदर वस्तुस्थिती सांगून सदर वाहन ताब्यात घेतले

आमची बाजू योग्य व कायदेशीर असल्याने सदर वाहन ताब्यात घेत असताना आम्हास सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, तसेच मित्र परिवार यांचा मोलाचा पाठिंबा मिळाला त्यामुळेच या मनबा फायनान्स वाल्यांची दादागिरी आम्ही मोडून काढू शकलो व कर्जदारास त्याचे कष्टाचे  दुचाकी वाहन परत देवू शकलो.

Share

Other News

ताज्या बातम्या