वडूज पोलिस ठाण्यात तीन जणांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

  • अतुल पवार (गुरसाळे)
  • Upadted: 24/08/2020 6:37 AM



खटाव तालुक्यातील एनकुळ येथील तीन जणांवर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वडूज पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, इनकुळ येथील ग्रामपंचायत गायरान हद्दीत एक चहाची टपरी टाकण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य विजय अर्जुनराव खाडे याने तक्रारदारकडे पंधरा हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने पाच हजार रुपये विजय खाडे याला दिले व चहाची टपरी सुरू झाल्यानंतर बाकीचे दहा हजार रुपये देईन अशी बोलणी झाली. चहाची टपरी सदर ठिकाणी तयार करून उभी करण्यात आल्यानंतर विजय खाडे याने दहा हजार रुपये आधी दे नाहीतर टपरी काढून घेऊन जा असे सांगितले त्यावर तक्रारदाराने इतर टपऱ्या काढून टाका मग मी माझी टपरी कडेन असे सांगितले. त्यानंतर विजय अर्जुनराव खाडे, अर्जुनराव रामचंद्र खाडे व आबासाहेब खाडे हे वडूज पोलीस ठाण्यात आले व त्यांनी चहाच्या टपरी बाबत तक्रार दिली. त्याचवेळी तक्रारदार वडूज पोलीस ठाण्याच्या बाहेर उभा असताना सदर तीनजण तक्रारदारकडे आले व आम्ही बघतो आमच्या गावात टपऱ्या चालू देऊ का, तू घरी ये तुला दाखवतो, तुझे घर गावात ठेवणार नाही अशी दमदाटी केली. तसेच आम्ही तुझ्यावर विनयभंगाच्या केसेस दाखल करू तुला काय करायचे आहे ते कर, तुमची घरे किती, तुम्ही बोलता किती, आमच्या डोक्यावर बसणार का असे म्हणून ते तीनजण निघून गेले.
अश्याप्रकारे जातीवाचक व अपमानास्पद भाष्य केल्याने तक्रारदाराने वडूज पोलीस ठाण्यात तक्रार केली व पोलिसांनी सदर तीन जणांवर अट्रोसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी करीत आहेत. या संबंधी तक्रारदाराशी संपर्क साधला असता तक्रारदारांनी सांगितले की एनकूळ ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे नागरिकांना शासनाकडून आलेल्या सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत शासनाच्या जमिनीवर काही गाव टग्या पुढाऱ्यांचे व ग्रामपंचायत सदस्यांचे अतिक्रमण आहे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस नोंदी केल्या आहेत सत्तेच्या जोरावर प्रशासकीय कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य जनतेची लूट करत आहे एनकूळ गावच्या ग्रामपंचायतीच्या कारभाराची जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ही तक्रारदारांनी केलेली आहे

Share

Other News

ताज्या बातम्या