सातारा जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाने सामान्यांसाठी नवीन संकल्प

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 26/03/2025 10:38 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)
सातारा दि: स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेने ३९ कोटी ४० लाखाचे सन २०२५- २६ चे अंदाजपत्रक आज मोठ्या उत्साहात सादर केले. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मराठी भाषेचा सन्मान राखत हा महत्वकांक्षी अर्थसंकल्प सादर केला. त्याचे सर्वसामान्य स्वागत केले. अर्थसंकल्पासोबतच नवीन संकल्प करण्यात आला आहे.
तो यशस्वी करण्यासाठी श्रीमती नागराजन यांच्यासह सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्ध, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, अर्चना वाघमळे, प्रज्ञा माने, रोहिणी ढवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे, कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विनोद पवार, कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, अमर नलावडे, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, प्रभावती कोळेकर, समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार, अनिस नायकवडी संजय लाड, समाधान चव्हाण, योगेश कारंजकर सुनील पवार विश्वास काटकर जयंत माळी राहुल मोरे व संजय जाधव आदी सातारा जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करणार आहेत.
सन २०२५-२६ यंदाच्या अंदाजपत्रकात सहा नवीन योजनेचा समावेश करण्यात आला असून त्याचबरोबरची लोकप्रिय ठरलेल्या योजनेची ही अंमलबजावणी करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. बांधकाम विभाग, समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग ,आरोग्य विभाग, वित्त विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, सामान्य प्रशासन, दिव्यांग कल्याण निधी, ग्रामीण पाणीपुरवठा, लघुपाटबंधारे विभाग ,ग्रामपंचायत विभाग अशा सर्व विभागाला तीन कोटी पासून ते चाळीस लाखापर्यंत तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा वासियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदिक दवाखाने, पाण्याची सत्राचे बळकटीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षमीकरण आणि ग्रामीण भागातील समाज मंदिराचे ज्ञानमंदिर करणे. यासाठीही विशेष लक्ष पुरविण्यात आलेले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांनी दुर्गम भागात जाऊन शासकीय योजना. पोहचवण्याचा विशेष प्रयत्न केला आहे. त्याच धर्तीवर पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सोमवार व शनिवारी मुख्यालयात राहणार असून इतर चार दिवस प्रत्यक्षात गाव पातळीवर अधिकाऱ्यांना जाण्याची सूचना केलेली आहे. यामुळे कागदोपत्री केलेल्या कामाची नोंद घेण्यापेक्षा प्रत्यक्षा गाव पातळीवर किती कामे झाले? याचे मूल्यमापन केले जाणार आहे. दरम्यान, या महत्वकांक्षी अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर वाढदिवसानिमित्त महिला बालकल्याण अधिकारी रोहिणी डोळे व जेष्ठ पत्रकार अजित जगताप यांचाही सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. ही विशेष बाब ठरली आहे. दिव्यांग यनी तयार केलेल्या कलाकृतीला बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तर चित्र देऊन शुभारंभ केलेला आहे असे सांगण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या